Pune Durg Case | ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीचा साथीदार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Durg Case | पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करुन अनेकांना अटक केली. पुणे पोलिसांनी देशभरात छापे टाकले होते. या ड्रग्जचं तस्करीचं कनेक्शन आता कर्नाटकमध्ये पोहोचलं असून पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी केली. या कारवाई ड्रग्ज तस्कर पप्पू कुरेशीला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया (Sandeep Dhunia) याचा पप्पू कुरेशी (Pappu Qureshi) हा साथीदार आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पप्पू कुरेशी आणि हैदर शेख हे दोघे मिळून पुण्यातील ड्रग्ज बाहेर विक्री करत होते. कुरेशी हा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया त्याच्या संपर्कात होता. आरोपीने ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रसायन पुण्यात काही ठिकाणी लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाने छापेमारी करुन शंभर कोटी
रुपयांपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले होते. पोलिसांनी 52 किलो मेफेड्रॉनचा साठा जप्त केला होता.
याप्रकरणी तिघांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नायजेरीयन नागरिकाने एमडी ड्रग्ज
दिले होते. त्याचा शोध घेत असताना पुणे पोलिसांनी राजधानी दिल्ली येथे छापे टाकले आणि 600 किलो अमली पदार्थ
जप्त केले. पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात 4 हजार कोटी रुपयांचे दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगेंचे मराठ्यांना आवाहन, देवेंद्र फडणवीसांची दहशत मोडायची म्हणजे मोडायची!

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde | रावणाला शिवधनुष्य पेललं नाही, या मिंध्याला पेलणार का? उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांसह शिंदेंवर घाणाघात