Pune : पुण्यातील NCL च्या परिसरात जुने हॅन्ड ग्रेनेड बॉम्ब (बॉम्ब सदृश्य वस्तु) आढळून आल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एनसीएलच्या परिसरात जुने हॅण्ड ग्रेनेड बॉम्ब (बॉम्ब सदृश्य वस्तु) आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बिडीडीएसचे पथक दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर भागात एनसीएलचा मोठा परिसर आहे. दुपारी एनसीएलच्या बाजूला मोकळ्या जागेत बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती, चतुःश्रृंगी पोलीस व नियंत्रण कक्षाला मिळाली होती. यानुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर बीडीडीएस व लष्कर याठिकाणी दाखल झाले. तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. जुने हॅण्ड ग्रेनेड असल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आता त्याची तपासणी करण्यात येत आहे. हे हॅण्ड ग्रेनेड नेमके कोठून आले याचा शोध आता घ्यावा लागणार आहे. मात्र यघटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.