Pune Faraskhana Police Station Crime | बुधवार पेठेतील भोई गल्लीत 35 वर्षीय महिलेच्या छातीवर ब्लेडने सपासप वार, भर रस्त्यात घडलेली घटना

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Faraskhana Police Station Crime | वेश्यागमनाचे रेटवरुन (Prostitution Rate) झालेल्या भांडणात एकाने महिलेवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी (Attempt To Kill) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Pune Faraskhana Police Station Crime) राजाप्पा सिद्धलिंगप्पा (वय 40, रा. जुनी वडारवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार बुधवार पेठेतील भोई गल्लीत (Bhoi Galli Budhwar Peth) शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता घडला. (Pune Crime News)

 

ADV

याप्रकरणी एका 35 वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या वेश्या व्यवसायासाठी उभ्या असताना आरोपी तेथे आला. वेश्यागमनाचे रेटवरुन त्यांच्या वाद झाला.
त्यांनी आरोपीबरोबर जाण्यास नकार दिला. या कारणावरुन आरोपीने “तू माझ्याबरोबर वेश्यागमनासाठी येत नाही का?. मी तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन त्यांच्याकडे असलेल्या दाढी करण्याचे ब्लेडने फिर्यादीच्या डाव्या छातीचे खालील बाजूला वार करुन फिर्यादीस गंभीर जखमी केले.

 

पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन सिद्धलिंगप्पा याला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Faraskhana Police Station Crime | A 35 year old woman was stabbed in the chest in Bhoi Galli Budhwar Peth Faraskhana Police Station limits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा