पुणे : Pune Fire News | नर्हे येथील माताजीनगरमधील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत ६ वाहने जळून खाक झाली. त्यात ४ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. (Pune Fire News)
याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, नर्हे येथील माताजीनगरमध्ये हरिहरेश्वर पार्क येथील तळमजल्यावर वाहने पार्क करण्यात आली होती. तेथे मध्यरात्री २ वाजल्यानंतर तेथील वाहनांना आगी लागली. वाहनांना आग लागल्याचे समजताच नागरिकांनी बादली व नळीच्या सहाय्याने पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. अग्निशामन दलाला या आगीची माहिती २ वाजून १८ मिनिटांनी मिळाली. दलाची गाडी तातडीने तेथे पोहचली. त्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. तोपर्यंत या आगीत ४ दुचाकी आणि २ चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या़. एका ऑटो रिक्षालाही आगीची झळ पोहचली आहे. (Pune Fire News)
पार्किंगच्या वरील सिलिंगच्या काही भागाला आगीची झळ लागली आहे.
ही इमारत सहा मजली असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. नवले अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश गोरे,
जवान भरत गोगावले, शिंदे, मदतनीस द. नलवडे, प्र. नलवडे, वि़ मछिंद्र, वाहनचालक पांगारे यांनी सहभाग घेतला.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update