पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | श्रीमंत भाऊ रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) मंदिरा जवळ असलेल्या देवरुखर यांच्या दुमजली लाकडी वाड्याला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मंदिर परिसरात असलेल्या अरुंद गल्लीत आग लागल्याने परिसरात घबराट उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून ०३ फायरगाड्या व ०३ वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. दुमजली वाड्यात सध्या कोणी वास्तव्यास नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र, आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.(Pune Fire News)
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्टॉनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जुन्या वाड्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. वाड्याच्या परिसरातील एका दुकानाला आग लागली. लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अरुंद गल्लीत बंब पोहचण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागला. आग लागल्यानंतर बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या जुन्या वाड्यात सध्या ट्रॉफी बनवण्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले आहे. या साहित्याने पेट घेतला असून मोठ्या प्रमाणात धुर झाला होता.
अग्नीशमन दलाच्या जवळपास १० अधिकारी व ४० जवानांनी आग इतरत्र पसरु न देता धोका टाळला.
जखमी वा जिवितहानी नाही. आग विझली असून सध्या याठिकाणी कुलिंग करण्याचे काम सुरु आहे.
आगीचे कारण सद्यस्थितीत समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा