Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

पुणे : Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुना बाजार येथील दुकानांना बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत ८ ते १० दुकाने जळून भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. (Pune Fire News)

जुन्या बाजारात फर्निचर, लोखंडी साहित्य, दुचाकीचे सुटे भाग विक्री करणारी दुकाने आहेत. त्यातील एका दुकानात सकाळी साडेसात वाजता आग लागली. अग्निशमन दलाला सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी वर्दी मिळाली. तातडीने ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख विजय भिलारे आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी आग आटोक्यात आणली. सध्या तेथे कुलिंगचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

या आगीत लाकडी साहित्य, प्लास्टिक माल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले.

Web Title :-  Pune Fire News | Fire to shops in old bazaar in Mangal Peth; 10 shops gutted in fire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो