Deepak Kesarkar | तुम्ही फक्त बोलता, आम्ही करुन दाखवतो, दीपक केसरकरांचा ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शेतकरी भेटीच्या औरंगाबाद दौऱ्यावर विरोधक टीका करत आहेत. आता पर्यावरण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लावला आहे. तुम्ही फक्त बोलता, आम्ही करुन दाखवतो, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

उद्धव ठाकरे फक्त बोलतात, पण आम्ही करुन दाखविले. आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट पैसे शेतकऱ्यांना दिले. तुम्ही जेवढे दिले, त्याच्या दुप्पट आम्ही कमी वेळात शेतकऱ्यांना दिले आहेत, असे केसकर (Deepak Kesarkar) म्हणाले. उद्धव ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला. तसेच त्यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका देखील केली आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

 

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत सरकारला खडे बोल सुनावले. ठाकरे म्हणाले, या निर्दयी सरकारकडे केवळ भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी आहे. आसूड फक्त हातात ठेवू नका, तो वापारा. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडा. आमच्यासोबत गद्दारी केली, शेतकऱ्यांसोबत करु नका, असे ठाकरेंनी यावेळी म्हंटले आहे.

परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कापणीला आलेल्या आणि कापून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, बाजरी आणि कापूस पिकांचा सामावेश आहे.
तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढल्या आहेत.
विमा कंपन्या शेतकऱ्यांची दाद घेत नसल्याच्या देखील तक्रारी आहेत.
त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी शिमगा बनून आली आहे.

 

Web Title :- Deepak Kesarkar | minister deepak kesarkar has criticized
former chief minister uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा