Pune : बाणेर परिसरातील व्यवसायिकाचे 15 लाखांसाठी अपहरण करणार्‍या चौघांना चतुःश्रृंगी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बाणेर भागातील शेअर ट्रेंडिंग करणाऱ्या व्यवसायिकाचे 15 लाखासाठी अपहरण करणाऱ्या चौघांना चतुशृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. व्यवसायिकाच्या ऑफिसात घुसून मारहाण करत त्यांच्याच कारमधून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुळशी तालुक्यात नेहून शेतात बांधून ठेवले होते.

मोहित हेमंत वेदपाठक (वय ३२, रा . गुलमोहर सोसा , फलॅट नं १०३. सफायर बिल्डींग, खराडी, मुळ, नांदेड), अक्षय दिलीप गिरीगोसावी (वय २७, रा, येरवडा) मारूती नंदू पवार (वय ३४, रा.मु.पो.माले, ता.मुळशी) व नरहरी मोतीराम भावेकर (वय ३१, रा.वळणे सोनारवाडी, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे शेअर ट्रेडींगचे कामे करतात. त्यांचे बाणेर येथील क्रिस्टल एम्पायर येथे ऑफिस आहे. दरम्यान यातील मोहित याची फिर्यादी यांच्याशी दहा वर्षांपूर्वीची ओळख आहे. दरम्यान त्याला फिर्यादी यांच्याकडे खूप पैसे येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर आरोपीने अपहरण करण्याचा कट रचला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी (दि 10) मोहित वेदपाठक व तीन साथीदार यानी ऑफिसमधून त्यांना मारहाण करत त्यांचे अपहरण केले. तर त्यांच्याच कारमधून त्यांचे अपहरण केले यानंतर त्यांना मुळशी तालुक्यातील एका शेतात नेले. त्याठिकाणी त्यांचे हात पाय बांधून त्यांना ठेवले.यानंतर त्यांचे मोबाईल, घड्याळ आणि अंगावरील सोने काढून घेतले. तसेच त्यांना 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांना मारहाण करत पैसे देण्यास सांगितले. फिर्यादी यांनी खात्यावरून पैसे काढून देण्याची तयारी दाखविली. त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या ऑफिसजवळ आणून सोडले. मग, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चतुःशृंगी पोलीसांनी दोन पथके तयार करत तपास सुरू केल्यानंतर मोहित वेदपाठक व त्याचे साथीदार हे मुळशी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पथकांनी सापळा रचून त्यांना पकडले. चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, व सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहाय्यक निरीक्षक संतोष कोळी, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, कर्मचारी सुधीर माने, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे श्रीकांत वाघवले, संतोष जाधव, भाऊराव वारे, प्रमोद शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे .