Pune : पुण्यातील पाटे बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल; केली 1 कोटी 71 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जमीन विकसनासाठी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील पाटे बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटे बिल्डरचे निलेश बाळकृष्ण पाटे, बाळकृष्ण काशिनाथ पाटे (रा. नारायण पेठ) यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटे बिल्डरने फिर्यादी यांची जमीन विकसनासाठी घेऊन 1 कोटी 71 लाख रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी सचिन अशोक अगरवाल (वय-40 रा. अश्विनी सोसायटी, वाकडेवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शिवजीनगर येथील महालक्ष्मी लँड डेव्हलपर्स सीटी स्केअर बिल्डींग येथे फेब्रुवारी 2012 ते एप्रिल 2021 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अगरवाल यांच्याकडून पाटे बिल्डर यांनी पौड येथील जमिन विकसनासाठी घेतली होती. त्यासाठी लेखी करारनामा देखील करण्यात आला होता. अगरवाल यांच्याकडून वेळोवेळी 1 कोटी 71 लाख रुपये रोख व धनादेश स्वरुपात घेतले होते. मात्र, पाटे यांनी अद्यापपर्यंत जमीन विकसित केली नाही. त्यामुळे अगरवाल यांनी पैशांची मागणी केली असता, पाटे यांनी सचिन अगरवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटया स्वरूपाचा असून दाखल गुन्हा हा देखील चुकीच्या पध्दतीने दाखल करण्यात असल्याचे योगेश पाटे (नीलेश पाटे यांचे बंधू) यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले आम्ही आमची पौड येथील जमीन विकसनासाठी सचिन अगरवाल यांना दिली होती. त्यांनी या प्रॉपर्टीवरून लोकांकडून पैसेदेखील घेतले आहेत. लोकांनीच उलट त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यांनी प्लॉट विकसित करून दिला नाही, याबाबत आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार दिली नाही, आमची चूक नसताना आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांचे पैसे परत करावेत हेच आमचे म्हणणे होते असं पाटे पुढं म्हणाले.