Pune : आरटीओ एजंटकडून पावणे पाच लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सहा हायवा (टिप्पर) गाड्यांचे पासिंग आणि रजिस्ट्रेशन करून देण्याचे सांगत एका आरोटीओ एजंटने पावणे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून पैसे घेऊनही पासिंग केले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी विष्णू उर्फ विशाल सोनवणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरटीओ एजंटचे नाव आहे. याबाबत युसूफ मूनशी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डी.बी. गुप्ता रियल इन्फो लिमिटेड कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. ते गेल्या एक वर्षापासून काम करत आहेत. त्यांचे कंपनीने सहा हायवा (टिप्पर) गाड्या खरेदी केल्या होत्या. त्याची पासिंग व रजिस्ट्रेशन आरटीओ कार्यालयात करायची होती. यादरम्यान त्यांनी एजंट विष्णू याला हे काम सांगितले. त्याने 6 गाड्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीकडून 4 लाख 72 हजार रुपये घेतले. मात्र गाड्यांची पासिंग, रजिस्ट्रेशन करून न देता त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.