Pune Ganesh Festival 2023 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी, पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganesh Festival 2023 | सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदूषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा (Loudspeaker) वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी निर्गमित केला आहे.(Pune Ganesh Festival 2023)

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 (Noise Pollution (Regulation and Control) Amendment Rules 2017) अन्वये सण उत्सव कालावधीसाठी 15 दिवसांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 16 फेब्रुवारी 2023 च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन 2023 च्या सण उत्सवांकरिता 13 दिवस निश्चित करुन 2 दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवा करिता 5 दिवस निश्चित करण्यात आले होते. (Pune Ganesh Festival 2023)

तथापि, विविध लोकप्रतीनिधी व गणपती मंडळे यांनी पुणे शहरात (Pune City) आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन (Ganesha Immersion) केले जात असल्याने सदर दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही (Pune Rural Police SP) परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव 2 दिवसांपैकी 1 दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जारी केले आहेत.

गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार 23 सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार 24 सप्टेंबर
(सहावा दिवस), मंगळवार 26 सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार 27 सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार 28 सप्टेंबर
(दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास
परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार 25 सप्टेंबर 2023 (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस
नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत
असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी 9 वर्ष का लागली? भाजपला खोचक टोला लगावताना काँग्रेसने म्हटले…

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद