Pune Ganeshotsav 2023 | पुणे पोलिसांकडून झोन-1 मधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक उद्या

Pune Ganeshotsav 2023 | A meeting of office bearers of public Ganesha Mandals in Zone-1 by Pune Police tomorrow

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023 | यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्न तसेच उत्साहात पार पडावा म्हणून पुणे पोलिसांकडून (Pune Police) झोन-1 मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस सह आयुक्त संदिप कर्णीक (IPS Sandeep Karnik) हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. झोन-1मधील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशमंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक गुरुवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजता दुर्वांकुर हॉलमध्ये होणार आहे. (Pune Ganeshotsav 2023)

पुण्यात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या सोहळ्याची तयारी करण्यासाठी उद्या पुणे पोलिसांनी गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. परिमंडळ एकमधील डेक्कन, फरासखाना, खडक, समर्थ, शिवाजीनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गणेशमंडळांची ही बैठक होणार आहे. (Pune Ganeshotsav 2023)

मंडळांना गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या अडचणी, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आवश्यक परवानगी
आदी मुद्द्यांवर या वेळी चर्चा होणार आहे. तसेच गणेशमंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये घ्यावयाची काळजी याबाबत
मार्गदर्शन केले जाणार आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने गणपती उत्सवाच्या ठिकाणची सुरक्षा,
गणेशोत्सव काळात रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | ‘ठाकरेंनीच महाराष्ट्रात युती तोडली, भाजपने नाही’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Maharashtra Rain | महाराष्ट्रात 10 ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

Mahesh Babu | दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या नावावर आहे असा ‘विक्रम’ जो आत्तापर्यंत कोणत्याही अभिनेत्याला मोडता आलेला नाही

Total
0
Shares
Related Posts