Pune Ganeshotsav 2023 | नदीपात्रात गणपती विसर्जनाला मनाई, हौदांचा वापर करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023 | गणेश चतुर्थीला गणतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन (Ganapati Visarjn) करण्यात आले. पुणे शहरामध्ये दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलप्रदुषण रोखण्यासाठी नदी, तलावात विसर्जन करु नये, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) दरवर्षी करण्यात येते. यंदाही महापालिकेने (Pune PMC News) नदीमध्ये विसर्जन न करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी असल्याने त्याचे पाण्यात विसर्जन होणार नाही, यासाठी पालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. (Pune Ganeshotsav 2023)

गणपती विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 42 विसर्जन हौद, 265 ठिकाणी 568
लोखंडी टाक्या, 252 गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि दीडशे फिरते हौद असे नियोजन केले आहे.
परंतु फिरते हौद पाचव्या दिवसापासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी दीड दिवसाच्या गणपतीचे घरच्या घरी किंवा महापालिकेच्या नदीपात्रातील विसर्जन हौदामध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यावर भर दिला.

जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मनाई असल्याने नागरिकांनी घरातच किंवा जवळच्या कृत्रिम हौदात, लोखंडी टाक्यांमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले. तर काहींनी मूर्ती दान करुन समाजभान जपले. दरम्यान, फिरते विसर्जन हौद आणि निर्माल्य कलश उपलब्ध नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. (Pune Ganeshotsav 2023)

पुणे महानगर पालिकेने नदीपात्रात, तलावात, कालव्यात मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये, असे आवाहन केले आहे.
या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम
यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | विसर्जन हौदाची पाहणी करताना आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का, दोन्ही पाय जळाले; हॅपी कॉलनीतील घटना