Pune Gultekdi Crime | किरकोळ कारणावरुन तरुणाला कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Gultekdi Crime | मित्रांसोबत गप्पा मारत थांबल्याच्या कारणावरुन एका तरुणाला कुऱ्हाडीच्या दांडक्याने व ट्युबलाईटने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील एकदिल मित्र मंडळाजवळ घडला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) चार जाणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जखमी निखिल ज्ञानोबा लगाडे (वय-19 रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आनंद राजू उमाप व त्याचा भाऊ यश राजू उमाप यांच्यासह दोन जणांवर आयपीसी 324, 504, 506, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल लगाडे हा मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना तुम्ही येथे का थांबलात अशी विचारणा केली. त्यानंतर हातातील कुऱ्हाडीच्या दांडक्याने व ट्युबलाईटने मारहाण केली. यामध्ये निखिल याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी आरडाओरडा करुन परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील (PSI Poonam Patil) करीत आहेत.

तरुणाला धारदार हत्याराने मारहाण

पुणे : भांडण का करता अशी विचारणा केली असता दोघांनी एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वडारवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी गणेश शंकर सुभेदार (वय-20 रा. वडारवाडी) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निशांत धोत्रे व रितेश पवार (रा. वडारवाडी) यांच्यावर आयपीसी 326, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र बाबा शेख याचे आरोपींसोबत भांडण झाले होते. याच रागातून आरोपी मारण्यासाठी येणार असल्याचे शेख याला समजले. त्याने याबाबत फिर्यादी गणेश यांना सांगितले. त्यावेळी गणेश आरोपींकडे भांडण का करता अशी विचारणा करण्यासाठी गेले होते. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करुन लोखंडी हत्यार गणेश याच्या हातावर मारुन जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केकाण करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त