Pune Hadapsar Crime | एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न, चोरट्याला रंगेहात पकडले; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | हडपसर भागातील हांडेवाडी येथील एका एटीएमवर टिकाव मारुन तोडफोड करुन पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.26) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी चौकातील एसबीआय एटीएम येथे घडली आहे. विक्रमलाल इंद्रलाल शहा (वय-28 रा. ऊरुळी देवाची) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Hadapsar Crime)

याबाबत पोलीस शिपाई वैभव देवराम भोसले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी 461, 511 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हडपसर भागातील हांडेवरी रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आरोपीने टिकाव मारुन एटीएमची तोडफोड केली. पैसे चोरी करत असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कुंजीरवाडीत महिलेचे गंठण पळविले

लोणी काळभोर : मुलाला घेऊन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने
महिलेच्या गळ्यातील एक लाख 35 हजार रुपये किमतीचे 3 तोळ्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले.
ही घटना सोमवारी (दि.26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथील मारुती मंदिरासमोर घडली.
याप्रकरणी विद्या विकास कुंजीर (वय-34 रा. कुंजीरवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत