Pune Hadapsar Crime | पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने वार केले. तसेच त्याच्या दुचाकीवर दगड मारुन नुकसान केल्याची घटना रविवारी (दि.25) दुपारी एकच्या सुमारास हडपसर येथील शिंदेवाडी पुलावर घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) चार जणावर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Hadapsar Crime)

याबाबत शिंदेवस्ती येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मोहसीन उर्फ अमन मुजावर, अकरम शेख, वसीम मुजावर, गोल्ड्या (सर्व रा. शिंदेवस्ती, हडपसर) यांच्यावर आयपीसी 324, 323, 427, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यामध्ये पूर्वी
किरकोळ कारणावरुन वाद झाला होता.
याचा राग आरोपींच्या मनात होता. रविवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी शिंदेवाडी पुलावरुन त्याच्या दुचाकीवरून
जात होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी याला शिवीगाळ करुन हाताने व धक्काबुक्की
करुन मारहाण केली. आरोपी गोल्ड्या याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादी याच्या डाव्या दंडावर वार
करुन जखमी केले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी याच्या दुचाकीवर दगड मारून दुचाकीचे नुकसान केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना