Pune Hadapsar News | फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar News | दिवाळी उत्सव हा फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक साजरा करूयात. (Diwali – 2023) वाढते प्रदूषणयाला आळा घालून, पर्यावरणाचे संरक्षण करूयात अशी शपथ शालेय विद्यार्थ्यांनी घेतली. शिवसमर्थ संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमात महात्मा फुले वसाहत येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर यांसमवेत एकत्रित फराळ केला. पतीच्या पश्चात मुलांचे संगोपन करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील एकल माता यांचाही यावेळी दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमात सर्वधर्मीय विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. (Pune Hadapsar News)

दर वर्षी फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगीच्या शेकडो घटना घडतात. यामध्ये जीवितहानी व वित्तहानी होते. पुणे शहराची व राज्याची प्रदूषण (Maharashtra Pollution) पातळी वाढलेली आहे, वाढत्या प्रदुषणामुळे अनेक पशु पक्षांचे मृत्यूचे प्रमाण या काळात वाढलेले दिसते. पर्यावरण रक्षणासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करू अशी संकल्पना राबविण्यात आली होती. पतीच्या पश्चात हाताला मिळेल ते काम करून मुलांचे संगोपन करून त्यांना चांगले शिक्षण मिळवून देणाऱ्या एकल मातांचा दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. (Pune Hadapsar News)

विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आकाश कंदील व विविध रंगांनी आकर्षक रित्या रंगविलेल्या पणत्या पालकांना भेट
देण्यात आल्या. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे विकास रासकर, अक्षय आबनावे, शिल्पा होले,
संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे (Manisha Waghmare) व सचिव सुरज अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Archies Trailer | जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर झाला रिलीज, सुहाना खान सोबतचं खुशी कपूर दिसणार दमदार भूमिकेत !

ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल