पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! अग्नीशस्त्रांची तस्करी करणार्‍या 6 जणांना हडपसर पोलिसांकडून अटक, 18 पिस्तूलांसह 27 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शस्त्र साठ्यात कुविख्यात असणाऱ्या 6 जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांच्या पथकाने तबल 18 पिस्तूलासह सापळा रचून अटक केली आहे. 6 जणांकडून 18 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा पकडण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी मोठा शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

अरबाज रशिद खान (वय 21, रा. शिरूर), सूरज रमेश चिंचणे उर्फ गुळ्या (वय 22, रा. फुरसुंगी), कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश (वय 19, रा. शिरूर), जयेश राजू गायकवाड उर्फ जय (वय 28, रा. शिरूर), शरद बन्सी मल्लाव (वय 21, रा. शिरूर), विकास भगत तौर उर्फ महाराज (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज खान आणि विकास भगत उर्फ महाराज हे टोळीचे प्रमुख आहेत. सर्वांवर पुणे व ग्रामीण पोलीस दलात गुन्हे दाखल आहेत. त्यात पिस्तुल तस्करी आणि इतर गुन्ह्याचा समावेश आहे, अशी माहिती परीमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार उपस्थित होते.

शहरात व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी, चोरी व अन्य गुन्हेच्या बाबत तपास करण्याचे उद्दीष्ट उपायुक्त सुहास बावचे यांनी हडपसर पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिस तपास करीत होते. त्यावेळी हडपसरमध्ये काही तरुण बेकायदा पिस्तुल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक सौरभ माने, सहायक उपनिरीक्षक पठाण, कर्मचारी नितीन मुढे, प्रशांत टोणपे, प्रवीण उत्तेकर व त्यांच्या पथकाने सापळा रचुन अटक केली. त्यावेळी एक पिस्तुल सापडले. यानंतर सखोल चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांच्याकडुन 18 पिस्तुल व 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी या शस्त्राचा वापर विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठी व विक्रीसाठी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. अन्य काही उद्देश आहेत का ? याचीही चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पिस्तुल कुठून आणले तसेच त्यांच्या आणखी काही साथीदार यांची माहिती मिळाली असून, आणखी शस्त्रसाठा मिळायची दाट शक्यता आहे. त्यांनी या पिस्तुलांचा काही ठिकाणी वापर देखील केला असल्याचे समजले आहे. आता त्यानुसार तपास सुरू आहे.