Pune Health News | चिंताजनक ! पुण्यात आढळला ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वराचा रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Health News) पहिल्यांदाच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वर आजाराचा रुग्ण आढळला आहे. एका चार वर्षांच्या बालकाला या आजाराची बाधा झाली आहे. 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो वडगाव शेरीचा रहिवाशी आहे. मंगळवारी (२९ नोव्हेंबर) त्याचा अहवाल एनआयव्हीमधून प्राप्त झाला, त्यानुसार तो ‘जेई’ पॉझिटिव्ह आहे. आता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Pune Health News) रुग्णाच्या परिसरातील ताप आणि डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी सुरू झाली होती. नंतर ताप कमी न होता वाढला आणि त्याला तापेचा झटका आला. त्यामुळे त्याचा एक हात आणि पाय कमकुवत झाला. सुरुवातीला त्याला खासगी दवाखान्यात दाखल केले होते. पण तिथून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. या बालकावर दहा दिवस ससूनमध्ये उपचार सुरू होते. आता त्याच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली असून, सध्या त्याला ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार दिले जात आहेत.

मेंदूज्वराची बाधा झालेला हा शहरातला (Pune Health News) पहिला रुग्ण आहे.
त्यानंतर हा रुग्ण ज्या भागात सापडला आहे, त्या भागात गेल्या 2 दिवसांपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
त्या रुग्णाच्या घरातील तसेच आजूबाजूच्या घरातील 15 वर्षांखालील मुलांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत.
तसेच वडगाव शेरी परिसरात तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचे सर्वेक्षण महापालिका करणार आहे.

Web Title :- Pune Health News | japanese encephalitis first patient found in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला दिली जिवे मारण्याची धमकी; होणाऱ्या नवऱ्याला दाखविणार होता ‘ते’ फोटो

Salman Khan | सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केले ‘हे’ गंभीर आरोप

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले