Pune Hinjewadi Crime | गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hinjewadi Crime | विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी (Ganja Case) हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून 83 हजार 500 रुपयांचा एक किलो 670 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मुळशी (Mulshi) तालुक्यातील माण (Man) येथे गुरुवारी (दि. 4) रात्री सव्वा आठच्या सुमारास केली.

भरत वाल्मिकी राठोड (वय-23 रा. मोहिते वस्ती, माण मुळ रा. केडगाव तांडा, सोलापुर) याच्यावर एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार रवि प्रकाश पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीतील पेट्रोलींग करत असताना माण येथील जॉय व्हीला सोसायटीसमोर एक तरुण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून भरत राठोड याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Hinjewadi Crime)

दारु विक्रीप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा

पिंपरी : हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारु विक्री करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील येलवडी येथील सन्मान हॉटेल
येथे केली असून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी हॉटेल मालक अक्षय प्रकाश असवले (वय-28 रा. टाकवे, ता. मावळ)
याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार गणेश सिताराम कारोटे यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन