Pune Hinjewadi Crime | आयटी इंजिनिअर तरुणीचा प्रियकराने गोळ्या घालून केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hinjewadi Crime | प्रेमप्रकरणातून (Love Affair) प्रियकराने सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer Murder In Pune) असलेल्या तरुणीवर गोळीबार करुन तिचा खून केला. त्यानंतर तो पळून गेला. मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करुन त्याला पिस्तुलासह अटक केली आहे.

वंदना द्विवेदी (रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे पोलिसांनी अटक केलेल्या माथेफिरु प्रियकराचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे़ वंदना ही इन्फोसिस या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. ऋषभ हा मुळचा लखनौ येथील राहणारा आहे. तो पुण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वंदना आणि ऋषभ हे बरोबर होते. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ते पहाटेच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात ऋषभ याने वंदनावर आपल्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. गोळी लागल्याने वंदना रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडली. त्यानंतर ऋषभ तेथून पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले. परंतु, वंदना हिचा मृत्यु झाला. ऋषभ हा मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचे समजल्यावर त्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला पिस्तुलसह ताब्यात घेतले. हिंजवडी पोलीस ऋषभ याला घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले असून त्याच्या चौकशीतून नेमका प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक