Pimpri News : तरुणीची कविता ऐकून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या डोळ्यात तरळले अश्रू (Video)

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलांच्या विरहात एका मुलीने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या समोर एक कविता सादर केली. कवितेतील शब्द कानावर पडताच ‘आयर्नमॅन’ म्हणून ओळखले जाणारे कृष्ण प्रकाश भावूक झाले. तरुणीने अतिशय भावनिक कविता ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे हळवे रुप आज अनेकांना पहायला मिळाले.

ऋतुजा शांतीलाल पाटील (रा. पळशी, सातारा) असे कविता सादर करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ऋतुजा लहान असताना तिच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर तिने आयुष्यात आलेले सर्व अनुभव ‘झुळूक’ या पुस्तकात मांडले. तसेच तिने ‘देवा घराचा बाबा’ या कवितेतून आपल्या भावनांना वाट करुन दिली. ही कविता ऐकताना कृष्ण प्रकाश भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

कविता वाचन झाल्यावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ऋतुजाला बक्षिस दिले. लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर बाबांविना असलेलं आयुष्य तिने कवितेच्या माध्यमातून मांडलं. ही कविता सादर करताना ऋतुजाने देखील आपल्या आश्रूंना वाट करुन दिली. तसेच यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले.