Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शाळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त

पुणे : Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत आपले वर्चस्व आबाधित राखण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार प्रचार सुरू केला आहे. या प्रचाराचे लोण आता शाळेपर्यंत येऊन पोहचले आहे. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

गुरूवारी सकाळी भाजपचे कसबा विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आपल्या प्रचारार्थ वाजत गाजत पदयात्रा काढली. शिंदे पार चौकात त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची माळ लावण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. या परिसरात बर्याच शाळा आहेत. पदयात्रेवेळी सकाळ सत्राची शाळा सुटली होती आणि दुपार सत्राची शाळा भरायची वेळ झाली होती. त्यामुळे पालकांची मुलांना ने-आण करायची गडबड सुरू होती. अशातच रासने पदयात्रेत नागरिकांना मत देण्याचे आवाहन करत करत आपल्या लवाजमा सहित डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या Deccan Education Society Pune (DES Pune) शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (NEMS Pune) पोहचले. तेथे त्यांनी पालकांना अभिवादन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची पत्रके वाटली. सर्वांना अभिवादन करत करत रासने थेट शाळेच्या कार्यालयात पोहचले. त्यानंतर ते शाळेच्या बाहेर निघून गेले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

बर्‍याच पालकांनी रासनेंच्या कार्यकर्त्यांना विचारले की, ही शाळा आहे.
येथे प्रचार कसा काय करता? तर रासने सगळ्यांना भेटत आहेत असे उत्तर मिळाले.
रासने थेट शाळेत प्रचारासाठी आल्यामुळे उपस्थित पालकांनी संतप्त भावना व्यक्त केली.
तसेच हे सगळे होत असताना शाळेच्या प्रशासनाकडून मात्र केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली.
यावरून देखील अनेक पालकांनी संताप व्यक्त केला. नाव न छापण्यााच्या अटीवर काही पालकांनी सांगितले की,
प्रचार करण्यासाठी शाळा हे ठिकाण नाही. त्यामुळे उमेदवारांनी आपण कुठे प्रचार करतोय याचे भान राखले पाहिजे.
तसेच शाळा प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळेच्या आवारात हे असे पुन्हा घडणार नाही
याची काळजी घ्यावी. अशी अपेक्षा देखील पालकांनी व्यक्त केली आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | BJP’s campaign till the pickle! Outrage from parents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून