Pune Kasba Peth Bypoll Election | टिळक कुटुंबियांच्या भेटीनंतर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची BJP वर टीका, म्हणाले – ‘…तर पुणेकरचं भाजपला त्यांची जागा दाखवतील’

0
319
Pune Kasba Peth Bypoll Election | kasba assembly by election congress candidate ravindra dhangekar met the tilak family
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षातर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. धंगेकरांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निवासस्थानी जात त्यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी शैलेश टिळक यांनी रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. (Pune Kasba Peth Bypoll Election)

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कांग्रेस पक्षाचे उमेदवार धंगेकर म्हणाले की, ‘मला काल रात्री नाना पटोले (Nana Patole) यांचा फोन आला. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा असून त्यासाठी तयारीला लागा, असे ते म्हणाले. त्यानुसार आज मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर केसरीवाडा येथे मुक्ता टिळक यांच्या घरच्यांची भेट घेतली आणि मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी द्यावी अशी भावना पुणेकर नागरिकांची होती. मात्र, भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. ही नाराजी शहरातील नागरिकांमध्ये आहे. भाजप ही निवडणुक मतदारांना गृहीत धरून लढवत आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक भाजपला (BJP) नक्कीच जागा दाखवतील.’ असं यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले. (Pune Kasba Peth Bypoll Election)

दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुण्यातील
कसबा आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे.
त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap)
यांच्या पत्नी आश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली असून कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली नाही.
त्यामुळे आता अत्यंत चुरशीचा बनलेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :-  Pune Kasba Peth Bypoll Election | kasba assembly by election congress candidate ravindra dhangekar met the tilak family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील संगीत पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी

Pune Crime News | स्त्रीधन, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम लांबवली; मुलीने आपल्याच वडिल, भावाविरुद्ध दिली तक्रार