Pune Kasba Peth Bypoll Election | लोकांना विकत घेऊन निवडणूका जिंकायच्या, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

रायपुर : वृत्तसंस्था – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर (BJP) पैसे वाटल्याचा आरोप केला. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीवर  गंभीर आरोप केले आहेत. मंत्री पोलीस संरक्षणात पैसे वाटप करत असल्याचा आरोप पटोले यांनी भाजपवर केला. तसेच पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने पोलिसांसोबत कसबा मतदारसंघात  पैसे वाटल्याचा आरोप करत धंगेकर यांनी उपोषण केले. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, रवींद्र धंगेकर यांना मीच उपोषण मागे घेण्यास सांगितले. लोकांना विकत घेऊन निवडणूका जिंकायच्या अशी भाजप असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

छत्तीसगड येथील रायपुर येथे काँग्रेसचे महाअधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये अनेक राज्यांचे नेते सहभागी झाले आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना गंभीर आरोप केले आहेत.

रवींद्र धंगेकर यांना मी सांगितले की आंदोलन मागे घ्या आणि लोकांमध्ये जा, असा दावा पटोले यांनी केला.
तसेच भाजप पोलिसांच्या संरक्षणात कसब्यात पैसे वाटत असल्याचा आरोप करत त्याचे व्हिडिओ माझ्याकडे असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला.
तसेच कसब्यात जो प्रकार घडला आहे याबाबत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार
केली आहे. आयोगाने तक्रारीची दखल घेऊन यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
तसेच कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी होतील असा दावाही त्यांनी केला.

Web Title :-Pune Kasba Peth Bypoll Election | nana patole has alleged that in the kasba by election the bjp is seeking money for police protection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू

Pune Kasba Peth Bypoll Election | रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार