Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत वंचित भाजपला मदत करत आहे, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठेची केली आहे. कसबा निवडणुकीत भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच दरम्यान भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजपने किती आर्थिक ताकद लावली आहे? भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले. सर्व महत्त्वाचे नेते त्याठिकाणी व्यस्त आहेत. निधीचा वापर मतांच्या विभाजनासाठी केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये रविवारी रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधला. महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या (Maharashtra Vision Forum) माध्यमातून ते महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाऊन युवकांशी संवाद साधत आहेत. दरम्यान या कार्य़क्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर आरोप केला आहे. कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजप पैशाचा वापर करतय असा आरोप होत आहे. या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, लोकांमध्ये तशी चर्चा आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले आहे. भाजपने किती आर्थिक ताकद लावली आहे? निधीचा वापर मतांचे विभाजन करण्यासाठी होत असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले कसबा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजपला अप्रत्यक्ष मदत करत आहे. विकास कुणी केला, हे लोकांना माहीत आहे.
सध्या गुंडागर्दी सुरु आहे. लोकं विकासाच्या बाजूने मतदान करतील, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकारण, सरकारचे निर्णय आणि निवडणुका याचे योगायोगाने टायमिंग जुळून आले आहे.
चिंचवड निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यावर निशाणा साधताना
रोहित पवार म्हणाले, त्यांच्याकडे किती खोके आले, हा प्रश्न आहे.
लोक हे विकास आणि माणूस यावर मत देतील असा विश्वास रोहित पवार यांनी बोलून दाखवला.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | ncp mla rohit pawar made serious allegations against vanchit bahujan aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हायप्रोफाईल सोसायटयांमध्ये घरफोडया करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेकडून अटक ! 1 कोटी 21 लाखांचा ऐवज जप्त; म्होरक्या उजाला उर्फ रॉबिन हुडवर 27 गुन्हयांची नोंद

Narayan Rane | पुण्यात येऊन बारा वाजवीन, नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा