Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक रद्द करा, ‘या’ उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप मविआने केल्यानंतर पराभव दिसत असल्याने असे आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर भाजपकडून दिले आहे. याच दरम्यान कसबा पोटनिवडणुकीतील (Pune Kasba Peth Bypoll Election) अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Independent Candidate Abhijit Bichukale) यांनी ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीचा शुक्रवारी संध्याकाळी प्रचार थांबल्यानंतर भाजप आणि काँग्रेसने प्रचार केल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. कसब्याचा तिसरा उमेदवार म्हणून मी कसब्याच्या दोन उमेदवारांवर कारवाई करण्याचे पत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करा आणि नव्याने घ्या अशी मागणी बिचुकले यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे.

भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला.
तसेच पोलीस (Pune Police) भाजपवर कारवाई करत नसल्याचा आरोप करत त्यांनी उपोषणाचा मार्ग
अवलंबला होता. यावर भाजपने आक्षेप घेत धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे
केली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेलं उपोषण हा आचार संहितेचा (Code of Conduct) भंग आहे, म्हणून ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. भाजप आणि बिचुकले यांच्या मागणीवर निवडणूक आयोग नेमकं काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | pune bypoll election abhijit bichukle demanded that cancel pune bypoll election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हायप्रोफाईल सोसायटयांमध्ये घरफोडया करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेकडून अटक ! 1 कोटी 21 लाखांचा ऐवज जप्त; म्होरक्या उजाला उर्फ रॉबिन हुडवर 27 गुन्हयांची नोंद

Narayan Rane | पुण्यात येऊन बारा वाजवीन, नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा