Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट, निवेदनाद्वारे केल्या ‘या’ मागण्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांतेत पार पाडण्यासाठी तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा यासाठी पुणे भाजपच्या (Pune BJP) शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांची आज भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांना निवदेन देऊन काही मागण्या केल्या आहे.

यावेळी कसबा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (City President Jagdish Mulik), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol), भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे (BJP General Secretary Rajesh Pandey) उपस्थित होते.

भाजपने निवेदनातून केल्या या मागण्या…

जिजामाता शाळा तांबट आळी (Jijamata School Tambat Ali) येथे असलेल्या केंद्रावर एकल (Single) नावे असून कुटुंबातील इतर व्यक्तींची नावे नाहीत, हे शंकास्पद वाटते त्यामुळे अशी नावे आढळून येतील. त्या वेळेस त्यांची कसून तपासणी व्हावी तसेच इथे कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बिघडू शकते तरी याठिकाणी अधिकचा बंदोबस्त तैनात करावा.

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) लोणार आळी तसेच दारुवाला पोलीस चौकी शेजारी
असलेल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान (Voting) होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आधार कार्ड, मतदान कार्ड याबाबतची सत्यता तपासली जावी.

Advt.

याशिवाय गुजराथी शाळा सिटी पोस्ट मागे या मतदान केंद्राचा परिसर संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी
पोलिसांचा अतिरिक्त बंदोस्त ठेवावा, अशा मागण्या भाजपने निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केल्या आहेत.

Web Title :-Pune Kasba Peth Bypoll Election | The BJP delegation met the Pune Police Commissioner, made these demands through a statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू

Pune Kasba Peth Bypoll Election | रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार? भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार