Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा चिंचवडमध्ये मनसे कोणाला पाठिंबा देणार? पक्षाने कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

Raj Thackeray On Reservation | mns raj thackeray on reservation says maharashtra dont need any reseravtion
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election | भाजप आमदार मुक्ता टिळक (BJP MLAs Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेचे मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला दोन्ही ठिकाणी मतदान होणार आहे. बुधवार (दि.8) पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु या निवडणुकीत मनसेची (MNS) काय भूमिका असणार, मनसे भाजपला पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)

प्रचारात सहभागी न होण्याचे आदेश

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे आदेश येईपर्यंत कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका, असे आदेश मनसचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना तसेच मनसेसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसे तटस्थ राहणार का? हे पहावे लागेल. (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election)

चिंचवडमध्ये तिरंगी लढत

कसबा पोट निवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाला डावलून हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी दिली आहे. तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कसब्यात धंगेकर आणि रासने यांच्या थेट लढत होणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली आहे. तर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे.या सर्व पार्श्वभूमिवर मनसे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु सध्यातरी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title :-Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | who will mns support in kasba chinchwad by election big update ahead

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Bypoll Election | एवढीच ताकद होती तर टिळक, घाटे, बापट यांना निवडून आणण्यात काय अडचण होती ?

Pune Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Repo Rate Hiked | आरबीआयचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ; तुमचा EMI कितीने वाढणार? जाणून घ्या

 

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’