Pune Katraj Crime | पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड, कोयते जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Crime | पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery On Petrol Pump) टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) सापळा रचून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून कोयते, मिरची पावडर सह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई 30 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास कात्रज येथील किनारा हॉटेल (Hotel Kinara in Katraj) पुढील पेट्रोल पंपाच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.(Pune Katraj Crime)

ओंकार उर्फ बाब्या संतोष पवार (वय-21 रा. मानाजीनगर, नऱ्हे), रोहित काशीनाथ धोंगडे उर्फ डी (वय-21 रा. महालीला निवास, कात्रज), रोहन विठ्ठल रणदिवे (वय-19 रा. त्रिमुर्ती हाईट्स, गुजरवाडी फाटा, कात्रज), संकेत संजय हटकर (वय-20 रा. बालभवन, संतोषनगर, कात्रज) यांना अटक करुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अंमलदार विक्रम दादासाहेब सावंत (वय-32) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 399, 402, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ओंकार पवार हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी किनारा हॉटेल पुढील पेट्रोल पंपाच्या मागील मोकळ्या जागेत काही तरुण अंधारात थांबले असून ते पेट्रोल पंपावर
दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून लोखंडी कोयते, मिरची पावडर, दोरी असे साहित्य जप्त केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड (API Vishwad Bhabad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी