Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

बारामती : Supriya Sule On BJP | भाजपाचे नेते बारामतीत येऊन म्हणतात, आम्हाला निवडणुकीत शरद पवारांना (Sharad Pawar) हरवायचे आहे. त्यांना विकास नाही करायचा. त्यांच्याकडे उमेदवारही नाही. आमचे घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून लागते आहे. याचाच विचार करा. माझ्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार मोठ्या भावाची पत्नी आईसमान असते. आमच्या माऊलीला भाजपाने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे याचा विचार करा, असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केला.

बारामती मतदार संघात (Baramati Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना काल उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली. याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपावर घर फोडल्याचा गंभीर आरोप केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्यासाठी बारामतीचा लढा हा वैचारिक आहे. माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही. माझी लढाई भाजपाच्या चुकीच्या धोरणांशी आहे. माझे राजकारण वैयक्तिक नाही. माझ्यावर कै. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. माझे राजकारण व्यक्ति केंद्रीत नाही तर वैचारिक आणि विकासाचे आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात दडपशाही आहे. महागाई वाढली आहे.
बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. देशात वाढणारा भ्रष्टाचार हा चिंतेचा विषय आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचे तर इथे पाण्याचा प्रश्न आहे.
उजनी धरण, नाझरा या ठिकाणी परिस्थिती बघा.

मतदारांना विनंती करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मी आभार मानते,
मला पुन्हा एकदा बारामतीतून लढण्याची संधी दिली.
तसेच मी प्रत्येक मतदाराचे आभार मानते ज्यांनी मला तीनवेळा खासदार म्हणून लोकसभेवर पाठवले.
या भागाची लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या अशी मी विनंती मतदारांना करते आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leopard Near Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळला बिबट्याचा नवजात बछडा, वनविभागाने ताब्यात घेऊन त्याला… (Video)

Pune Hadapsar News | ‘राईड टू सेफ्टी’ प्रकल्पांतर्गत पोलीस व त्यांच्या पाल्यांना हेल्मेटचे वाटप