Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court News | व्हॉट्सअॅपद्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी (Balewadi) येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट (Prostitution Racket ) मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. रॉकी उर्फ ऋषिकेश शिरीष कदम (Rocky Alias Rishikesh Shirish Kadam) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन (Chaturshrungi Police Station) येथे गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर आयपीसी कलम 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बालेवाडी परिसरातील हॉटेल व अपार्टमेंट मध्ये व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाइन चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील एजंट आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Janapurkar) यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा सर्व भागातील 11 तरुणींची सुटका करण्यात आली होती. तर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तपासादरम्यान हॉटेल टॅग हाऊस, लक्ष्मी नगर येथील द विला हॉटेल आणि पॅन कार्ड क्लब रोडवरील स्नेह अपार्टमेंट या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला होता.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादनुसार बालेवाडी येथील दोन हॉटेल आणि एका अपार्टमेंट मध्ये व्हॉट्सअॅप द्वारे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पदकाला समजली. त्यानुसार पथकाने या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली, त्यानंतर मिटकॉन कॉलेज जवळील हॉटेल टॅग हाऊस मधील तीन रूम मध्ये छापा टाकला. तसेच स्नेह अपार्टमेंट आणि हॉटेल द विला मधील रूममध्ये छापा टाकून एकूण 11 तरुणींची सुटका करण्यात आली. आरोपींनी हॉटेलमध्ये रूम बुक करून त्यासाठी सदर मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वतःची उपजीविका भागवत होते. पोलिसांनी 6 हजार रुपये रोख रक्कम व इतर मुद्देमाल जप्त केला. तसेच पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन यांनी केला.

या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपी तर्फे बाजू मांडली.
तसेच सरकारी वकील यांनी देखील त्यांची बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला असता,
कोर्टाच्या निदर्शनानुसार हा गुन्हा गंभीर असून समाजावर परिणाम होतो,
मात्र तपास हा कागदोपत्री खरा तपास झाल्याचे उघड होत आहे.

अर्जदार आरोपीची फौजदारी उत्तरदायित्व हा खटल्याचा विषय आहे.
शिवाय या प्रकरणात सापडलेल्या पीडित महिला सज्ञान आहेत.
आरोपी याने मानवी तस्करीच्या रकमेतून केलेल्या कोणत्याही प्रकारचे उघड कृत्य प्रतिबिंबित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सामग्री नाही,
आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवण्याची गरज नाही.
या सर्व परिस्थितीचा विचार करता न्यायाधीश एस. बी. राठोड (Judge S.B. Rathod) यांनी आरोपीचा अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leopard Near Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळला बिबट्याचा नवजात बछडा, वनविभागाने ताब्यात घेऊन त्याला… (Video)

Pune Hadapsar News | ‘राईड टू सेफ्टी’ प्रकल्पांतर्गत पोलीस व त्यांच्या पाल्यांना हेल्मेटचे वाटप