Pune Katraj Crime | पुणे : खळबळजनक! फनफेअरमध्ये खेळताना शॉक लागून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, कात्रज परिसरातील घटना

पुणे : Pune Katraj Crime | पुण्यातील कात्रज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कात्रज परिसरातील राजस चौकात (Rajas Society Chowk) सुरु असलेल्या फनफेअरमध्ये (Fun Fair Park) खेळण्यासाठी गेलेल्या एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याला विजेचा जोरदार शॉक बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.13) रात्री उशीरा घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील राजस सोसायटी चौकाजवळ लहान मुलांना खेळण्यासाठी फनफेअर पार्क आहे. लहान मुलांना याठिकाणी करमणूकीसाठी पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाऊस अशी साधने उभी करण्यात आली आहेत. या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जाते. पैसे देऊन लोक आपल्या लहान मुलांच्या करमणुकीसाठी याठिकाणी येत असतात. (Pune Katraj Crime)

शनिवारी रात्री या पार्कमध्ये खेळण्यासाठी आलेल्या नऊ वर्षाच्या मुलाला विजेचा शॉक बसला.
पार्कमधील पाळण्यामध्ये बसताना लोखंडी पायरीवरुन चढत असताना मुलाला शॉक बसला.
यामध्ये मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी भारती विद्यापीठ पोलिसांना (Bharti Vidyapeeth Police) दिली.

घटना घडल्यानंतर मुलाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला.
मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल
असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त