Pune Katraj Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सराईत गुन्हेगारावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj Crime | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) मित्राच्या घरी बोलवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून पीडित मुलगी नुकतीच प्रसुत झाली असून तिने एका मुलाल जन्म दिला आहे. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार (Criminal On Police Records) असून त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) कारवाई करण्यात आली असून सध्या त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Jail) स्थानबद्ध करण्यात आले आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत आरोपीच्या घरी व कात्रज येथे मित्राच्या घरात घडला आहे.(Pune Katraj Crime)

याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. 29) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर संदीप शर्मा (रा. एसआरए वसाहत, भारती विद्यापीठ, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/जे/एन, 376/3 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची दोन वर्षापूर्वी ओळख झाली.
आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले.
तिला स्वत:च्या आणि कात्रज येथील मित्राच्या घरी वारंवार बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने 27 मार्च रोजी संध्याकाळी एका बाळाला जन्म दिला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन सागर शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भाबड करीत आहेत.

आरोपी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी डिसेंबर 2023 मध्ये सागर याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करुन एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सागर शर्मा विरुद्ध गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune News | पोलीस यंत्रणा एफ.एफ.सी.पी. मुस्कान संस्थेमार्फत पथनाट्य सादर करुन जनजागृती

Rohit Pawar | ”अनेकजण परत येण्यास इच्छूक, हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”, रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत