Pune News | पोलीस यंत्रणा एफ.एफ.सी.पी. मुस्कान संस्थेमार्फत पथनाट्य सादर करुन जनजागृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | खडक पोलीस स्टेशन (Khadak Police Station) दामिनी मार्शल (Damini marshal ) व फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान संस्था (Foundation For Child Protection – Muskaan) यांच्या संयुक्तविद्यमाने काशेवाडी (Kashewadi) वस्तीमध्ये बालकांसाठी बाल लैंगिक अत्याचार (Child Sexual Abuse) प्रतिबंध साठी पथनाट्य सादर करुन जनजागृती करण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड (Sr PI Ravindra Gaikwad) यांच्या मार्गदर्शनखाली काशेवाडी वस्तीमध्ये जनजागृती करण्यात आली.(Pune News)

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान संस्थेमार्फत गेली २३ वर्ष बाल लैंगिक अत्याचार विषयी जनजागृती काम सुरू आहे. पुण्यामध्ये शाळा, वस्ती, शासकीय यंत्रणा व समजिक संस्था सोबत याविषयी काम सुरू आहे. मुस्कान मार्फत बालक, पालक, शिक्षक यांच्यासाठी बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा 2012 याविषयी कार्यक्रम असतात. मात्र मुस्कान संस्थे मार्फत पथनाट्य च्या माध्यमातून देखील याविषयाची माहिती समाजामध्ये पोहचवली जाते.

खडक दामिनी निवेदिता यादव यांनी काशेवाडी वस्ती मध्ये मुस्कान संस्थे मार्फत वस्तीतील बालक व पालकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. मुस्कान ने पथनाट्यच्या माध्यमातून बालक म्हणजे कोण.
बालकांचे अधिकार, बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय, कोण व कुठे करू शकतात.
बाल लैंगिक अत्याचार मुळे बालकावर होणारे गंभीर परिणाम व अश्या परिस्थितीमध्ये बालकांनी घ्यावयाची काळजी.
तसेच पालक म्हणून पालकांची भूमिका व पोलीस यंत्रणेकडून मिळणारे सहकार्य याबाबत माहिती दिली.
व पॉक्सो कायदा २०१२ बाबत माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना ह्या बालकाच्या जवळच्या नात्यातील
लोक करतात तर त्याविषयी पालकांनी न घाबरता अश्या घटना पोलिसात किंवा पोलीस हेल्पलाईन 112, 1091, 1098 व मुस्कान हेल्पलाईन 9689062202 नंबर वर माहिती देण्याचे आव्हान केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”