Pune Khadak Police | सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक, पिस्तुल व काडतसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadak Police | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Criminal On Police Records) अटक करुन त्याच्याकडून पिस्टल आणि जिवंत काडतसे जप्त केली आहेत (Pistol Seized) . त्याच्याकडून 55 हजार रुपये किंमतीचे पिस्टल आणि दोन हजार रुपयांचे दोन काडतुसे जप्त केली आहेत. खडक पोलिसांनी ही कारवाई बुधवारी (दि.10) गंज पेठेतील मिठापेल्ली वाड्याजवळ केली.(Pune Khadak Police)

रोहित श्रीनिवास रागीर Rohit Srinivas Ragir (वय-24 रा. घोरपडे पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी, अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम यांना माहिती मिळाली की, गंजपेठेतील मिठापेल्ली वाड्याजवळ सराईत गुन्हेगार रोहित रागीर थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकजण उभारल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्टल व दोन काडतसे असा एकूण 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)