Pune : खडकी बाजार परिसरात पैसे देवाण घेवणीवरून तुंबळ हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकी बाजार परिसरात दुधाच्या पिशवीच्या पैसे देवाण घेवणीवरून तुंबळ हाणामारी झाली असून, दुकानदार व त्याच्या भावाने एकाला बेदम मारहाण केली आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी तौसिफ शेख (वय 30) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अश्रफ तांबोळी व मुफियान तांबोळी यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे शनिवारी रात्री उशिरा दूध पिशवी घेण्यास गेले होते. तर त्यावेळी दुकानात असलेल्या दूध असण्यास गेला होता. त्यावेळी अश्रफ व फिर्यादी यांच्यात दुधाचे पैसे दिलेले असताना देखील त्यांच्यात पैसे देणे-घेण्यावरून वाद झाला. त्यावेळी अश्रफ याने चुलत भाऊ मुफियान याला बोलवून घेत त्या दोघांनी फिर्यादी याला बेदम मारहाण केली. तर लोखंडी रॉडने डोक्यात मारत जबर जखमी केले आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.