Pune Khadki Crime | खंडणीची मागणी करुन वाहनांची तोडफोड, खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadki Crime | टेम्पो पार्क करण्यासाठी करण्यासाठी खंडणीची मागणी करुन टेम्पोच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवेवरील (Pune Mumbai Highway) बोपोडी (Bopodi) येथील अनुपमनगरी बिल्डिंग समोर घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) दोघांवर खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला आहे.(Pune Khadki Crime)

याबाबत उमर फारुख मैहबुब मुल्ला (वय-26 रा. गोपीचाळ, बापोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिनेश प्रल्हाद कांबळे (वय-26), फिरोज फकरुद्दीन शेख (वय-21 रा. गोपीचाळ, बोपोडी) यांच्यावर आयपीसी 385, 336, 427, 504, 506, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा टेम्पो जुना पुणे-मुंबई मार्गावरील बोपोडी येथील अनुपमनगरी बिल्डिंग समोर पार्क करतात. या ठिकाणी टेम्पो पार्क करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे खंडणी मागितली. तसेच खंडणी दिली नाही तर टेम्पो पार्क करुन देणार नाही अशी धमकी दिली. आरोपींनी त्याठिकाणी पार्क केलेल्या इतर टेम्पोची लाकडी दांडक्याने व दगडाने काच फोडून नुकसान केले. तसेच आपण या ठिकाणचे भाई आहोत असे मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे (PSI Maloji Kamble) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

Pimpri Traffic Updates | पिंपरी : तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Lok Sabha | ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’ ! मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार (Video)