Pune Kondhwa Crime | उसने पैसे परत करताना जास्त पैसे दिल्याच्या कारणावरुन मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | उसने घेतलेले पैसे परत करताना जास्तीचे पैसे दिल्याच्या रागातून एका तरुणाला कोयता (Koyta Attack) फेकून मारला. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार कोंढवा परिसरातील मोहम्मदवाडी (Mohammed Wadi) येथील दिल्ली पब्लीक स्कुल जवळ Delhi Public School (DPS) गुरुवारी (दि.28) दुपारी पावणे चारच्या सुमारास घडला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लक्ष्मण दत्ताराम हिवराळे (वय-25 रा. मोहम्मदवाडी, विठ्ठल पार्क, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सागर कांबळे (वय-32), गुंडेराव कांबळे (वय-48), साहिल कांबळे (वय-27 सर्व रा. कृष्णा नगर, मोहम्मदवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हिवराळे यांचा फ्लेक्स प्रिटींगचा व्यवसाय आहे.
त्यांचा मित्र आणि आरोपींचा भाऊ रोहीत गुंडेराव कांबळे याला उसने 35 हजार रुपये दिले होते.
वेळेवर पैशांची मदत केल्याने रोहीतने 22 मार्च रोजी उसने घेतलेले पैसे फिर्य़ादी यांना परत केले.
मात्र, पैसे परत करत असताना रोहीतने फिर्यादी यांना 15 हजार रुपये जास्त दिले. फिर्यादी यांनी 15 हजार रुपये घेतल्याच्या कारणावरुन रोहितचा भाऊ साहिल याने फिर्यादी यांना कोयता फेकून मारला. मात्र, त्यांनी वार चुकवला. त्यानंतर आरोपींनी लक्ष्मण हिवराळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

Pune Kondhwa Crime | तरुणीला कीस करुन अश्लील चाळे, कोंढवा परिसरातील घटना

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune News | पोलीस यंत्रणा एफ.एफ.सी.पी. मुस्कान संस्थेमार्फत पथनाट्य सादर करुन जनजागृती

Rohit Pawar | ”अनेकजण परत येण्यास इच्छूक, हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है”, रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत