Pune Kondhwa Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना हडपसर परिसरातील काळेपडळ (Kale Padal Hadapsar) येथे घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी व 20 मार्च रोजी आरोपीच्या राहत्या घरात घडला आहे.

याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीने मंगळवारी (दि.2) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन काळेपडळ येथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या मुलावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीसोबत मैत्री करुन तिला लग्नाचे आमिष दखवले. पीडित मुलीला भेटण्यासाठी घरी बोलावून घेत तिच्यासोबत दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. याबाबत घरच्यांना सांगितले तर तुला आणि घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे (API Amit Shete) करीत आहेत. (Pune Kondhwa Crime)

रिक्षाचालकाचे महिलेसोबत अश्लील वर्तन

कोंढवा : रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेसोबत रिक्षाचालकाने असभ्य व अश्लील वर्तन (Obscene Behavior)
करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार रविवारी (दि.1) रात्री सात वाजण्याच्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road)
आयटी हॉस्टेल चौकातील एका गॅरेज जवळ घडला आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी (Bibvewadi) येथे राहणाऱ्या 22 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन अनोळखी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर (API Vikas Babar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने