Pune Kondhwa Crime | लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा कोंढवा पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | लष्करात नोकरी लावण्याचे आमिष (Lure Of Job In Army) दाखवून फसवणूक (Cheating Fraud Case) करुन नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. गणेश बाबुलाल परदेश Ganesh Babulal Pardeshi (रा. कृष्ण केवला सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Kondhwa Crime)

गणेश परदेशी याने लष्करात नोकरीच्या आमिषाने आठ लाख 32 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल होती.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर परदेशी पसार झाला होता.
पोलीस त्याच्या मागावर होते मात्र त्याने राहण्याचे ठिकाण बदलल्याने आणि ओळख लपवण्यासाठी चेहरा कपड्याने झाकत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. परदेशी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, विकास मरगळे आणि शशांक खाडे यांना मिळाली. कोंढवा भागातील एका दुकानात चेहरा झाकून खरेदीसाठी आलेल्या परदेशीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अमोल हिरवे,
राहुल वंजारी, अभिजीत रन्तपारखी, शशांक खाडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी