Pune Kondhwa Police Station | कोंढवा परिसरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा, मिरवणुकीतील सहभागी मुलांचे कोंढवा पोलिसांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Police Station | गणेशोत्सवानंतर पुण्यात ईद-ए-मिलाद (Eid e Milad 2023) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलाद निमित्त कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी कोंढवा पोलिसांच्या वतीने सत्यानंद हॉस्पिटलसमोर स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. (Pune Kondhwa Police Station)

कोंढवा पोलीस स्टेशन मधील 28 मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामधील 2 मंडळांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जागेवरती मिरवणूक पूर्ण केली. तर 26 मंडळे पुणे शहरामध्ये कार्यक्रमाकरिता रवाना झाली. मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीमध्ये आपली मिरवणूक घेऊन जावी, वाहतुकीचे नियम पाळावेत, स्पीकरचा आवाज नियमात ठेवावा, असे आवाहन कोंढवा पोलिसांनी केले. (Pune Kondhwa Police Station)

संपूर्ण मिरवणूक मार्गावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले
(PI Sandeep Bhosale), संजय मोगले (PI Sanjay Mogle) तसेच कोंढवा पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी
अंमलदार यांनी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Prakash Ambedkar | जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाले – ‘…तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्यावरचा पर्याय’