Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेकडून 6 मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये (Spa Center In Koregaon Park) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) प्रकार गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत थायलंडच्या चार तरुणींसह सहा मुलींची सुटका करण्यात आली असून स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.

मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय 27, रा. जाधवनगर, मुंढवा मुळ रा. जुनिजान ता. जि. हुजाई, आसाम) आणि स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय 32, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) यांच्यावर आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रेश्मा सुरेश कंक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्य़ाद दिली. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडे सहा वाजता केली.

कोरेगाव पार्क परिसरातील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटर येथे छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. यामध्ये चार थायलंड आणि दोन आसाम मधील तरुणीचा समावेश आहे.

आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक