Pune Koregaon Park Crime | मैत्रिणीच्या मित्राकडून तरुणीला मारहाण, अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; कोरेगाव पार्क परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Koregaon Park Crime | आमच्या संबंधात हस्तक्षेप करु नको असे म्हणत एका तरुणीला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) करुन तिला धक्काबुक्की केली. तसेच तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी (दि.31 मार्च) रात्री दीडच्या सुमारास हॉटेल प्लन्झ समोरील सार्वजनिक जागेत घडली.(Pune Koregaon Park Crime)

याबाबत उंड्री (Undri) येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गौरव दुग्गल (वय-45 रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या मैत्रिणीचा पुर्वीचा मित्र आहे. तु आमच्यामध्ये हस्तेक्षेप करु नकोस, असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता त्याने फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. तसेच अश्लील कृत्य करुन विनयभंग केला. तु येथून घरी कशी जाते हेच पाहतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले (PSI Ashwini Bhosale) करीत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

वाघोली : लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून लग्नास नकार देऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी वाघोली (Wagholi) येथे राहणाऱ्या तरुणीने रविवारी (दि.31) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संतोष सुधाकर शेंडगे Santosh Sudhakar Shendge (वय-31 रा. फुलारेवस्ती, ता. नेवासा जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत पीडितेच्या राहत्या घरात घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी