Pune Koregaon Park Crime | तरुणीकडे पाहून रिक्षाचालकाचे अश्लील हातवारे, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क परिसरात महिलांसोबत छेडछाड करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सोमवारी रात्री रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला पाहून अश्लील कमेंट (Obscene Comment) करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) तरुणीकडे पाहून अश्लील हातवारे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे (Molestation Case). हा प्रकार रविवारी (दि.24) रात्री सात ते आठच्या दरम्यान हॉटेल माउटंनगोट (Hotel Mountain Goat), लेन नं. 6 येथे घडला आहे.

याबाबत चंदननगर येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.28) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी रिक्षाचालकावर आयपीसी 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लेन नं.6 येथील हॉटेल माउटंनगोट येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Koregaon Park Crime)

ससुन रुग्णालयातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

पुणे : ससुन रुग्णालायत (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केलेली 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्ड नंबर 21 मध्ये घडला आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी यांनी 14 वर्षाच्या मुलीला ससुन हॉस्पिटलमधील वॉर्ड नं. 21 येथे तपासणी करण्यासाठी दाखल केले होते. मुलगी उपचार घेत असताना ती अचानाक कोणालाच काहीही न सांगता निघून गेली आहे. तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल