Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Crime | हरवलेल्या मोबाईल बाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन एका तरुणावर लोखंडी सत्तुराने वार करुन जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.10) रात्री सव्वाबाराच्या सुमारास कोथरुड भागातील जयभवानी नगर येथे घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Stabbing Case Kothrud)

अक्षय सदाशिव काळोखे (वय-29 रा. लक्ष्मीनारायण, मातावळवाडी फाटा, भुगाव) याने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बाळु महादेव सगट (वय-30 रा. जयभवानी नगर, कोथरुड) याच्यावर आयपीसी 324, 504, 506 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला सीआरपीसी 141(1) प्रमाणे नोटीस दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा हरवलेला मोबाईल बाबत विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की व शिवीगाळ झाली. आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी सत्तुर आणून फिर्यादी यांच्या डोक्यात व कपाळावर मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Kothrud Crime)

बोर्डला गाडी धडकल्याच्या कारणावरुन मारहाण

विश्रांतवाडी : चारचाकी गाडीची धडक बोर्डाला बसल्याने बोर्ड वाकडा झाला. यावरुन वाद घालून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.
हा प्रकार टिंगरे नगर येथील साबीर इनामदार फ्रेंडस सर्कल बोर्डाजवळ शनिवारी (दि.9) रात्री सव्वादहा वाजण्याच्या
सुमारास घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तेजस राजेंद्र मिलखे (वय-24 रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साबीर इनामदार, अजिंक्य भोसले (रा. टिंगरे नगर) व एका अनोळखी तरुणावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. शनिवारी रात्री तेजस त्यांच्या चारचाकी गाडीतून घराकडे जात होते. त्यावेळी साबीर इनामदार फ्रेंड्स सर्कल बोडाला त्यांच्या गाडीची धडक बसली. यामुळे बोर्ड वाकडा झाला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी