Pune Krushi Utpanna Bazar Samiti | पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आल्यानंतर पुन्हा शिवनेरी पथावर अतिक्रमणाला सुरुवात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिक्रमण, वाहतुककोंडी (Traffic Jam In Marketyard) आणि मार्केटयार्डातील (Market Yard Pune) शिवनेरी रस्ता (Shivneri Road) हे कोड आजपर्यंत सुटलेले नाही. गेली वर्षभर हा रस्ता मोकळा झाला असताना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune Krushi Utpanna Bazar Samiti) संचालक मंडळ येताच पुन्हा हा रस्ता अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीत अडकला आहे. संचालक मंडळ आल्यानंतर लाखो रूपये खर्च करून बाजार समितीने केलेली कारवाई पाण्यात गेली आहे. पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍यांची बिर्‍हाडांनी घर थाटली आहेत. रस्त्यावर बाजार मांडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संचालक मंडळाच्या आशिर्वादामुळे यावर कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. (Pune Krushi Utpanna Bazar Samiti)

मार्केटयार्डातील शिवनेरी रस्त्यावर सातारा रस्ता येथील सिग्नल ते टपाल कार्यालयापर्यंत दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. दिवसेंदिवस फळविक्रेते, भाजीविक्रेते आणि टपर्‍यांची संख्या वाढत आहे. माल घेऊन येणारी वाहने, खरेदीसाठी येणारी वाहने वेड्यावाकड्या पद्धतीने रस्त्यावर लावली जात आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. म्हणूनच कायम या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तसेच या रस्त्यावर राडारोड्याचे प्रमाणही वाढले आहे. एकूणच हा रस्ता विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांनी पोलीस, पालिका आणि बाजार समिती अशा संयुक्त कारवाईतून हा रस्ता मोकळा केला.

अतिक्रमणमुक्त रस्ता केल्यानंतर गरड यांनी या रस्त्यावर पे अ‍ॅन्ड पार्क करून उत्पन्न सुरू केले. मात्र, संचालक मंडळाने कारभार हाती घेताल पुन्हा दुकाने थाटली गेली. प्रचंड वाहतुक कोंडीच्या भितीने सणांच्या काळात या रस्त्याने जाण्यास वाहनचालक धजावतात. नुकताच गणेशोत्सव, दसरा सण होऊन गेला. या काळात शेतकर्‍यांनी शिवनेरी रस्त्यावर फुलांची विक्री केली. मात्र,या रस्त्यावरील अतिक्रमणे आणि बाजार समितीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे चक्क सचिवांना वाहतुककोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. कोंडीमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप झाला. यानिमित्ताने बाजारात सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नसल्याचा प्रत्यय सर्वांना आला. आता दिवाळीपुर्वी तरी अतिक्रमण हटविले जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Pune Krushi Utpanna Bazar Samiti)

याबाबत सुरक्षा व अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख बापू कोतवाल म्हणाले,
बाजार समितीच्या शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण निर्मुलन कारवाईसाठी स्वतंत्र ठेकेदाराकडे
जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून अतिक्रमण निर्मुलनासाठी कारवाई सुरू आहे.

बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आल्यानंतर पुन्हा शिवनेरी पथावर अतिक्रमणाला सुरुवात झाली आहे.
या अतिक्रमणामुळे बाजार समिती नेमके कोणासाठी काम करत आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | त्यांना राज्यात अशांतता पसरवायची असेल, पण…, भुजबळांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जरांगेंची प्रतिक्रिया

ICC World Cup 2023 | एकही चेंडू न खेळता श्रीलंकेचा मॅथ्यूज आउट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं (व्हिडिओ)

Pune Crime News | 2 कोटीच्या फसवणूक प्रकरणात महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला