ICC World Cup 2023 | एकही चेंडू न खेळता श्रीलंकेचा मॅथ्यूज आउट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये (ICC World Cup 2023) आज 38 वा सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यात होत आहे. या सामान्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, यावेळी क्रिकेटच्या इतिहासात पहिलांदाच कोणी विचार करु शकणार नाही अशा पद्धतीने बॅट्समनला आउट घोषित करण्यात आले. (ICC World Cup 2023)

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium Delhi) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात वर्ल्ड कपचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. श्रीलंकेचे फलंदाज मैदानात उतरले. मात्र, 25 ओव्हर पर्यंत बांगलादेशने लंकेचे पाच फलंदाज तंबूत परत पाठवले होते. यावेळी श्रीलंकेचा स्कोर केवळ 135 होता. मात्र, यावेळी बांगलादेशने श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजची (Angelo Mathews) अशी विकेट घेतली की ते पाहून सर्वच हैराण झाले. (ICC World Cup 2023)

https://x.com/shawstopper_100/status/1721481627463790653?s=20

नेमकं काय घडलं?

25 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर श्रीलंकेच्या 4 विकेट्स गेल्या होत्या. शाकिबच्या बॉलवर श्रीलंकेचा बॅट्समन सदीरा समरविक्रमा हा कॅच आउट झाला होता. यानंतर क्रिकेटच्या नियमांनुसार विकेट पडल्यानंतर दुसऱ्या बॅट्समनने पुढील 2 मिनिटांत क्रीजवर येणे आवश्यक असते. मात्र झालं असं की समरविक्रमाची विकेट गेल्यावर अँजेलो मॅथ्यूज मैदानावर आला मात्र त्याला तेथे पोहोचायला थोडा वेळ लागला. आणि त्यानंतर त्याच्या हेल्मेटमध्ये काहीतरी समस्या आल्याने त्याने हेल्मेट चेंज करण्यासाठी सांगितले. मात्र, या दरम्यान तो दिलेल्या वेळेत क्रीजवर पोहोचू शकला नाही. याच कारणामुळे बांगलादेशच्या संघाने टाइम आऊटचे अपील केले आणि मॅथ्यूजला आउट देण्यात आले.

या प्रकरारानंतर मॅथ्यूजने अंपायर सोबत बराच वेळ वाद घातला. पण नियमानुसार मॅथ्यूजला आउट देण्यात आले. परंतु बांगलादेशने जे काही केले ते खेळाच्या नियमाला धरुन नसल्याची टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच असे घडले आहे की एखादा खेळाडूला टाइम आउटमुळे स्वत:ची विकेट गमवावी लागली.

शाकिब अल हसनने जेव्हा टाइम आउटचे अपील केले तेव्हा अंपायर देखील हैराण झाले.
अंपायरने शाकिबकडे विचारणा देखील केली की तुम्ही खरच टाइम आउटची अपील करणार आहात का.
यावर शाकिबने होकार दिला ज्यामुळे अंपायरला मॅथ्यूजला बाद द्यावे लागले. बंगलादेश संघाकडून जो काही प्रकार झाला
ते पाहून मॅथ्यूज देखील हैराण झाला. या प्रकारामुळे श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य देखील नाराज झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katewadi Gram Panchayat Election 2023 | पवारांचा बालेकिल्ला असलेल्या काटेवाडीत भाजपाने केला शिरकाव, इतक्या जागा जिंकल्या?

Maratha Kunbi Certificates | पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण : जिल्हाधिकारी