Pune : कासेवाडीतील कत्तलखान्यातून 2 गायी व एका पारड्याला दिले जीवनदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कासेवाडीमध्ये दोन जिवंत गायी आणि पारडांचे जीव वाचविले, तर सहा टन गोमांस जप्त करून पाचजणांना अटक केल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख शादाब मुलानी यांनी दिली. खडक पोलीस स्टेशन अंकित मिठगंज पोलीस चौकीच्या मदतीने ही कारवाई शुक्रवारी (दि. 16) पहाटे केली. चार खाटकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रज्जाक माइन कुरेशी (वय 29, रा. भवानी पेठ, पुणे), यासिन वाजिद कुरेशी (वय 22, रा. कॅम्प, पुणे), शहाबाद शफीक कुरेशी (वय 25, रा. कसाई मोहल्ला, कॅम्प, पुणे), हर्षद वाडेकर (वय 32, रा. भवानी पेठ, पुणे), समीर कुरेशी (रा. कासेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर रिझवान कुरेशी (वय 35, रा. कोंढवा) हा फरार असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

मुलानी म्हणाले की, कासेवाडीमध्ये बंद पत्र्याच्या शेडमध्ये गायींची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांच्या मदतीने पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे निखील दरेकर, सचिन चित्रे, नीलेश पवार, गणेश कामठे, मयूर शिंदे यांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये दोन जीवंत गायी आणि एक पारडू आढळले. गायी आणि पारडाला ताब्यात घेऊन तुकाईदर्शन येथील द्वारकाधीश गो शाळेत दिले. त्यानंतर सात टन गोमांस कोंढवा येथे सरकारी जागेत गाडून टाकण्यात आले. पुढील तपास मिठगंज पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत, पोलीस शिपाई आनंद गोसावी करीत आहेत.