स्थानिक गुन्हे शाखेकडून ATM चोरीचा गुन्हा उघड. अवघ्या 2 दिवसांत उघडकीस आणला गुन्हा

शिक्रापुर : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील एटीएम फोडून ७३हजार९०० रुपयांची रोकड लांबविणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने तपास करत गजाआड केले असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे नगर महामार्गावर सरदवाडी येथील एटीएम फोडून नेल्याने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांना आव्हान बनले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिसांना सीसी टीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता शिक्रापूर येथे चाकण चौक येथे दोन संशयित व्यक्ती १) विकास रामजी तोरकड (वय २४ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता शिरूर, मूळ रा.पारोडा ता.जि.हिंगोली) २)सुनिल रामजी तोरकड (वय २६वर्षे.रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता शिरूर मूळ रा पारोडा ता जि हिंगोली) या आरोपींनी हा गुन्हा त्यांच्या मित्रांसोबत केल्याचे सांगितले. सदरचा गुन्हा उघडकीस आणून वरील दोन आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास करीता शिरूर पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले.

हा तपास पुणे ग्रामीण चे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे , एएसआय दत्तात्रय गिरमकर, एएसआय दयानंद लिमन, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, पोलिस नाईक जनार्दन शेळके, पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक राजू मोमीन, पोलिस नाईक चंद्रकांत जाधव, पोलिस कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू वीरकर यांनी केला आहे.